गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई; दोन महिला जेरबंद, दीड लाखांचा ऐवज जप्त**

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन महिलांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अटक करत त्यांच्या ताब्यातून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे चोरीतील सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पालखी सोहळ्यातील गर्दीत सक्रिय असलेल्या चोरट्यांविरुद्ध केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार विशेष बंदोबस्त आणि गस्त पथके तैनात करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखालील पथक पालखी मार्गावर संशयितांवर बारकाईने नजर ठेवून होते.

दरम्यान, संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांना संशय आला दिलीप राठोड व स्वप्निल महाले यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे साहेबांना बोलावले  व त्यांना ताब्यात घेण्यात आलेल्या महिला  त्यामधील एक अल्पवयीन मुलगी त्यामधील एक फिर्यादी यांची सोनसाखळी चोरत  त्यांना दिलीप राठोड व स्वप्निल महाले यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे साहेबांना बोलवलं तात्काळ अटक करून  घेऊन चौकशी केली असता   त्यांनी वारकऱ्यां  गर्दीत सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. तपासात नयना विष्णू काळे (वय २०, रा. घोरपडे पेठ, छत्रपती संभाजीनगर) आणि सुनीता नारायणराव राजूत (वय ५०) अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यांच्या ताब्यातून चोरीतील १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व इतर दागिने जप्त करण्यात आले.

या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींकडून यापूर्वी घडलेल्या इतर चोरीच्या घटनांचाही तपास सुरू आहे.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

See also  १५ तास मृत्यूशी झुंज... 'जिवंत आमिष' बनून नरभक्षक वाघिणीला जेरबंद; डॉ. प्रियल चौरागडे यांच्या धाडसाला सलाम!

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुखविंदरसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव, पोलीस अंमलदार सुरेखा बोरे, बाळासाहेब नगरे, सोमनाथ बोहाडे, दिलीप राठोड, निखिल फापाळे आणि स्वप्नील महाले यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत आरोपींना जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गुन्हे शाखेकडून पुढील काळातही अशाच धडक कारवाया आणि विशेष गस्त सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!