स्मार्ट मीटरवर खोटा ‘कॅमेरा’चा दावा महागात; ग्राहक प्रतिनिधी आणि यूट्यूब संपादकावर फौजदारी गुन्हा!

काशिनाथ शिंदे : मुंबई

महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा आरोप करून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर आणि ‘कोकणसाद’ यूट्यूब न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, स्मार्ट मीटरबाबत कपोलकल्पित माहिती पसरवून जनतेत भीती निर्माण केल्याचा आरोप केला आहे. तसेच चर्चासत्रातील संदर्भ वगळून दिशाभूल करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३ (१)(ब), ३५१ (३), ३५२ आणि ३५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.

महावितरणने स्पष्ट केले की, स्मार्ट मीटर हे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्यामध्ये कोणताही कॅमेरा किंवा नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग करणारी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी अफवा आणि खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. स्मार्ट मीटरबाबत जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महावितरणने दिला आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, सावंतवाडी येथे ‘कोकणसाद’ यूट्यूब चॅनेलवर स्मार्ट मीटर विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चेत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेंद्र वाघ, ग्राहक संघटनेचे नंदन वेंगुर्लेकर आणि दीपक पटेकर सहभागी झाले होते. महावितरणने स्मार्ट मीटरचे फायदे आणि त्यावरील विविध शंकांचे निरसन केले होते.

मात्र, चर्चेदरम्यान नंदन वेंगुर्लेकर यांनी स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा दावा केला. त्यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेंद्र वाघ यांनी तत्काळ या दाव्याचे खंडन करून वस्तुस्थिती स्पष्ट केली. असे असतानाही, चर्चेतील महावितरणचा खुलासा वगळून केवळ दिशाभूल करणारा दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ ‘स्मार्ट मीटरची चिरफाड’ या मथळ्याखाली सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे.

See also  पोलीस शिपाईपदी अमृता शिंदेची भरारी; बावी गावाने लेकीचा केला जाहीर सत्कार

या प्रकरणामुळे स्मार्ट मीटरबाबत खोटी माहिती पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!