गांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद

चाकण, काशिनाथ शिंदे  :    पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने चाकण परिसरात धडक कारवाई करत तब्बल २३ किलो ५३८ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गांजा, तीन मोबाईल फोन आणि रोख रकमेसह एकूण १२ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अंमली पदार्थविरोधी पथकाला संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. त्यानुसार २७ मे रोजी दुपारी चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्रापूर-चाकण महामार्गावरील मोहितेवाडी परिसरात सापळा रचण्यात आला.

कारवाईदरम्यान संदीप भगवान हांडे (वय २८), गणेश सुरेश तारू (वय ३०) आणि रेहान वसीम शेख (वय १९) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून २३ किलो ५३८ ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अंमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार निखिल शेटे, विजय दाडेकर, पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे, गोविंद डोके, निखिल वर्पे, संतोष सपकाळ आणि चंद्रकांत जाधव यांनी ही कारवाई यशस्वी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी सहाय्यक पोलीस फौजदार नागेश माळी, पोलीस हवालदार प्रकाश ननावरे आणि पोलीस शिपाई सुभाष गुरव यांनी विशेष मदत केली.

See also  एमडी-अफीम तस्करीवर पोलिसांचा घणाघात; दोघे जेरबंद!

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी मोठे यश मानली जात असून, आगामी काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Posts

अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!