पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यान, वाल्हेकरवाडी रोड येथे गेली सुमारे ५० वर्षे रस्त्याच्या विकासकामात अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी (ओव्हरहेड हायटेन्शन लाईन) कायमस्वरूपी हटविण्याच्या कामाला आज प्रारंभ झाला. या कामाच्या प्रारंभी शेखर अण्णा चिंचवडे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची ही उच्चदाब वीजवाहिनी रस्त्याच्या विकासात अडथळा ठरत असल्याने ती हटविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. या वीजवाहिनीमुळे परिसरातील रस्त्याच्या विकासकामांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
अखेर या पाठपुराव्याला यश आले असून, संबंधित वीजवाहिनी कायमस्वरूपी हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील रस्ते विकासाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागत असल्याने परिसरातील नागरी सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हीच प्राथमिकता असल्याचे या कामातून अधोरेखित होत आहे.






