राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवडमधून राज्यव्यापी जनजागृती अभियानाचा प्रारंभ; संघटन विस्ताराचा निर्धार

 

काशिनाथ शिंदे : पिंपरी

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन चिंचवड येथील पूर्णानगर येथे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाजप नेते विकास यदुवंशी यांच्या हस्ते उत्साहात झाले. यावेळी राज्यव्यापी जनजागृती अभियानालाही प्रारंभ करण्यात आला.

उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मणिपूर आणि अन्य राज्यांतील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात संघटन बळकटीकरण, नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, आगामी सामाजिक उपक्रमांचे नियोजन आणि राज्यभर जनसंपर्क वाढविण्याचा आराखडा जाहीर करण्यात आला.

यावेळी विकास यदुवंशी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समिती अधिक वेगाने कार्य करणार असल्याचे सांगितले. युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर जनसहभाग वाढविणे तसेच सामाजिक सेवा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा, महानगर आणि तालुकास्तरावर समितीचे जाळे अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत समितीच्या आगामी वाटचालीची दिशा आणि राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास राष्ट्रीय महामंत्री बालाजी सूर्यवंशी, राष्ट्रीय मंत्री लक्ष्मण कांबळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामचंद्र बुडानिया, महाराष्ट्र राज्य महामंत्री दत्तात्रय शेळके, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद आगळेकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र म्हेत्रे, युवा मोर्चा अध्यक्ष फिरोज इराणी, उत्तर प्रदेशच्या प्रदेश मंत्री मुस्कान यदुवंशी, राष्ट्रीय महामंत्री रिव्या देवी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. विशाल यादव, मणिपूरचे प्रदेश उपाध्यक्ष सलाम जैक्सन सिंह यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी “सेवा, संघटन आणि राष्ट्रनिर्माण हा आमचा संकल्प” या घोषवाक्याने परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्रात सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

See also  कोयता गँगचा पुन्हा रक्तरंजित धुमाकूळ! १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; ४ आरोपी जेरबंद, भर पावसात पोलिसांनी काढली धिंड

 

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!