मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

एसबीपीआयएममध्ये ‘आरंभ’ कार्यक्रमांतर्गत चर्चासत्र संपन्न

काशिनाथ शिंदे

पिंपरी : “मानव संसाधन आणि मनुष्यबळ विकास हे क्षेत्र लोक आणि संस्कृतीशी संबंधित आहे. मानव संसाधन म्हणजे माणसांची काळजी घेणे. कोणतेही तंत्रज्ञान माणसांची जागा घेऊ शकत नाही; ते केवळ माहिती आणि डेटा उपलब्ध करून देते. तंत्रज्ञानामुळे जीवन सुलभ होते. करिअर घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे,” असे मार्गदर्शन ‘पीपल अँड कल्चर’ विभागाच्या प्रमुख चैत्राली पाटेकर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे आयोजित ‘आरंभ’ कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी फोसेकोच्या ह्युमन रिसोर्स डायरेक्टर प्राची संचाल, एसबीपीआयएमच्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर, ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ व आरोग्य संशोधक डॉ. वैजयंती पटवर्धन, जपानी भाषा संचालक डॉ. मानसी शिरगुरकर आणि शैक्षणिक प्रमुख रूपाली कुदरे आदी उपस्थित होते.

प्राची संचाल यांनी आधुनिक कौशल्ये, वचनबद्धता आणि करुणा या त्रिसूत्रीचा जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले. व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कौशल्यांसोबतच कामाप्रती निष्ठा आणि संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी महिलांच्या सामाजिक, मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक समस्यांवर प्रकाश टाकला. या समस्यांचा महिलांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक महिलेच्या सुखी जीवनाचा पाया निरोगी आणि सुदृढ आरोग्य हा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. मानसी शिरगुरकर यांनी जपानमध्ये नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी जपानी भाषा, संस्कृती आणि जपानी ब्रँड्सविषयी माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर करिअरच्या संधी मिळवण्यासाठी संबंधित देशाची भाषा आणि संस्कृती समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

See also  माथाडी कामगारांकडून अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रणिता बुरबुरे आणि डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी केले, तर आभार डॉ. योगेंद्र देवकर यांनी मानले.

  • Related Posts

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी; नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिक, कंत्राटदार तसेच…

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    २०० हून अधिक वधू-वरांचा सहभाग; सामाजिक संपर्क वाढविण्यासह वेळ आणि पैशाची बचत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, पुणे : समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण