माथाडी कामगारांकडून अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

चिंचवडमध्ये ९६ वी जयंती उत्साहात; कामगारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढण्याचा निर्धार

पिंपरी : माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९६ वी जयंती भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने चिंचवडमध्ये शुक्रवारी (दि. २५) उत्साहात साजरी करण्यात आली. केएसबी चौकातील अण्णासाहेब पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ हा कार्यक्रम झाला.

यावेळी माथाडी कामगारांनी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माथाडी कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी अण्णासाहेब पाटील यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या विचारांना पुढे नेत कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय भोसूरे, पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळाचे कामगार प्रतिनिधी रामकृष्ण घावटे, टाटा मोटर्स येथील टोळी क्रमांक ४९५ चे मुकादम विलास घोगरे, अजय जैद, अमित माने, सचिन कोकरे, महिंद्रा अँड महिंद्रा येथील मुकादम स्वप्नील सौबले, इंद्रजीत भिसे, सूरज गवस यांच्यासह माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र ओळ : भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या वतीने कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

See also  मोशीतील खुनाचा २४ तासांत पर्दाफाश! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून पतीसह चौघांना अटक
  • Related Posts

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश