महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी; नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई

काशिनाथ शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिक, कंत्राटदार तसेच कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीकडून भेटवस्तू अथवा देणग्या स्वीकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांच्या स्वाक्षरीने अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्यपद्धती कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लागू असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे पालन बंधनकारक

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम १२ नुसार, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने स्वतः कोणतीही भेटवस्तू किंवा देणगी स्वीकारू नये. तसेच, आपल्या कुटुंबीयांना किंवा आपल्या वतीने काम करणाऱ्या अन्य व्यक्तींना अशा भेटवस्तू स्वीकारण्याची परवानगी देऊ नये, अशी तरतूद आहे.

याशिवाय, कार्यालयीन व्यवहार असलेल्या व्यक्ती, औद्योगिक किंवा वाणिज्यिक संस्था आणि संघटनांकडून वारंवार केला जाणारा पाहुणचार स्वीकारणे टाळण्याचे निर्देशही या नियमांत देण्यात आले आहेत.

कार्यालयात भेटवस्तू आणणाऱ्यांना प्रवेश रोखण्याचे निर्देश

या नियमांच्या अनुषंगाने महापालिकेतील सर्व विभागांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटवस्तू किंवा देणग्या स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधितांच्या कुटुंबीयांनी किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तींनीही अशा भेटवस्तू स्वीकारू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सुरक्षा विभागालाही कार्यालयात भेटवस्तू घेऊन येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देण्यापासून रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिक, कंत्राटदार किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून भेटवस्तू किंवा देणगी स्वीकारल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.

See also  पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

या निर्णयामुळे महापालिकेच्या कामकाजात निष्पक्षता आणि प्रशासकीय शिस्त राखण्यावर भर देण्यात आला आहे.

  • Related Posts

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश