२०० हून अधिक वधू-वरांचा सहभाग; सामाजिक संपर्क वाढविण्यासह वेळ आणि पैशाची बचत
काशिनाथ शिंदे
पिंपरी, पुणे : समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या पालकांना परस्पर परिचयाची संधी उपलब्ध करून देणारा खान्देश माळी मंडळ, पिंपरी-चिंचवड यांचा २८ वा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित या मेळाव्यात डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, शिक्षक तसेच पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या २०० हून अधिक विवाहेच्छुक वधू-वरांनी सहभाग घेतला.
समाजाला अशा मेळाव्यांची गरज – योगेश बहल
खान्देश माळी मंडळाने सामाजिक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून आयोजित केलेला हा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्कृष्ट आयोजनाचे उदाहरण आहे. अशा मेळाव्यांमुळे समाजातील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचतो, तसेच सामाजिक संपर्कही वृद्धिंगत होतो. त्यामुळे अशा उपक्रमांची सर्व समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केले.
या कार्यक्रमाला कामगार नेते योगेश तळेकर, नाशिक येथील महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष प्रकाश महाजन, पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर तथा नगरसेविका वैशाली घोडेकर, खान्देश माळी मंडळाचे अध्यक्ष नकुल महाजन, अभिनेते डॉ. संजीव पाटील, निवृत्त अधिकारी दादाजी सोनवणे, भडगाव येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दीपक संभाजी महाजन, जळगावच्या माजी नगरसेविका सरिता नेरकर, मंडळाचे माजी अध्यक्ष पी. के. महाजन, नानाभाऊ माळी, वधू-वर समितीचे प्रमुख उदयभान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रकाश महाजन यांनी भूषविले.
विवाहेच्छुकांना परिचयाची संधी
या मेळाव्याच्या माध्यमातून विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील विवाहेच्छुक वधू-वरांना एकमेकांची माहिती जाणून घेण्याची, तसेच पालकांना योग्य स्थळांबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली. समाजातील विवाहविषयक जुळवाजुळव सुलभ व्हावी आणि परस्पर संवाद वाढावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष नकुल महाजन यांनी केले. राजेंद्र महाजन यांनी स्वागत केले, तर नवल खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. पूनम वाघ, रमेश बिरारी आणि ॲड. गोविंदा माळी यांनी विवाहेच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. गणेश चौधरी यांनी आभार मानले.
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सहकार्य
मेळावा यशस्वी करण्यासाठी रमेश सोनवणे, समितीचे उपाध्यक्ष योगेश माळी, संस्थापक एस. के. माळी, उपाध्यक्ष प्रशांत महाजन, खजिनदार रवींद्र माळी, संघटक दीपक बागुल, रजनी वाघ, सेवानिवृत्त अधिकारी विजय महाजन, नलिनी वाघ, सुधाकर बोरसे, ज्ञानेश्वर वाघ, सुधीर महाजन, ज्येष्ठ सल्लागार भीमराव माळी, किशोर वाघ, डी. के. माळी, एस. डी. माळी, पी. झेड. माळी, ज्ञानेश्वर महाजन, जितेंद्र चौधरी, अनिल सोनवणे, नितीन देवरे, विजय वाघ, सुभाष देवरे, भरत सोनवणे, शशिकांत खलाणे, पंढरीनाथ महाजन, प्रदीप देवरे, भगवान माळी, केशव सौंदाणे, निलेश खैरनार, पोपट पवार, सचिन अहीरे, खुशाल शेवाळे, भूषण मोरे, सुभाष माळी, किशोर बागुल, ऋषिकेश महाजन, सुनील माळी, समीर माळी, किरण माळी, भरत अहीरे, अर्जुन वाघ, गणेश महाजन, ईश्वर देवरे, पूनमचंद महाजन, ज्ञानेश्वर देशमुख आदींनी परिश्रम घेतले.





