पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय; शस्त्रे, स्फोटकज्वलनशील पदार्थांवर बंदी

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : आगामी विविध सण-उत्सव आणि २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून २९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३) अन्वये पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी हा आदेश जारी केला आहे.

या कालावधीत विविध सण, उत्सव, जयंती व पुण्यतिथींच्या कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, धरणे, निदर्शने, उपोषणे, बंद आदी आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

शस्त्रे आणि ज्वलनशील पदार्थांवर कडक निर्बंध

मनाई आदेशाच्या कालावधीत दाहक किंवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ, दगड, शस्त्रे-अस्त्रे, फेकण्यासाठी वापरता येणारी हत्यारे, काचेचे तुकडे तसेच रिकाम्या काचेच्या बाटल्या बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

याशिवाय चाकू, सुरा, कोयता, तलवार, भाला, काठी, बंदूक अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तू सोबत बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर निर्बंध

पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, सभा घेणे अथवा मिरवणूक काढणे यावरही निर्बंध घालण्यात आला आहे.

तसेच आक्षेपार्ह घोषणा देणे, सभ्यता व नीतिमत्तेला बाधा आणणारी भाषणे करणे किंवा कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कर्तव्यावरील व्यक्तींना सूट

See also  सहा तासांत खुनाच्या प्रयत्नाचा छडा; सहा आरोपींसह विधीसंघर्षित बालक ताब्यात

शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तींना तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य बजावताना हत्यार बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

उल्लंघन केल्यास कारवाई

मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

  • Related Posts

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    गुन्हे शाखा युनिट-३ची दमदार कामगिरी; छत्रपती संभाजीनगरातून आरोपी ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चाकण दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहितेवाडी-शेलपिंपळगाव येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे…

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान राज्यभर ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे, विविध प्रमाणपत्रे तसेच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’

    पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

    पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

    भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावा

    भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावा

    लोकअदालतीत तडजोडीचा ‘न्याय’! पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणे निकाली

    लोकअदालतीत तडजोडीचा ‘न्याय’! पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणे निकाली