थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!

महावितरणचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांचा अधिकाऱ्यांना सक्त इशारा; पुणे परिमंडलात अचानक 

काशिनाथ शिंदे

पुणे: वीजबिलाच्या थकबाकीपोटी खंडित केलेली वीजजोडणी चालू वीजबिलासह संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत पूर्ववत करू नका, अशा स्पष्ट आणि सक्त सूचना महावितरणचे कार्यकारी संचालक (वीज खरेदी) दिनेश अग्रवाल यांनी दिल्या आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी पुणे परिमंडलातील विश्रांतवाडी आणि वाडिया उपविभागांना अचानक भेट देत थकबाकीदार ग्राहकांच्या खंडित वीजजोडण्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीदरम्यान वाडिया उपविभागातील मे. फिस्टहाऊस हॉस्पिटॅलिटी आणि प्रभावती नामदेव पिंगळे या दोन थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. संबंधित ग्राहकांकडे अनुक्रमे ७ लाख ६९ हजार रुपये आणि ५ लाख ४४ हजार रुपये इतकी थकबाकी असल्याचे आढळले. मे. फिस्टहाऊस हॉस्पिटॅलिटी या ग्राहकाकडून हप्त्यांमध्ये पैसे भरले जात असल्याने थकबाकी कायम राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चालू वीजबिलासह संपूर्ण थकबाकी वसूल झाल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश अग्रवाल यांनी दिले.

वसुलीसाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरावे!

वीजबिल वसुलीची मोहीम केवळ कार्यालयीन कामकाजापुरती मर्यादित न ठेवता अधिकाऱ्यांनी स्वतः क्षेत्रात उतरून तिचा नियमित आढावा घ्यावा, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. थकबाकी वसुलीसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांना अधिक गती देऊन चालू वीजबिलासह संपूर्ण थकीत रक्कम वसूल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वीजग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी आहे, तर वेळेत वीजबिल भरणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे. ग्राहकांमध्ये नियमित वीजबिल भरण्याची सवय निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करावा. थकबाकीचा डोंगर वाढण्यापूर्वीच नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यास सुरक्षा ठेवीतून थकीत रक्कम वळती करण्याची वेळ येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

या आकस्मिक पाहणीवेळी प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदिले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोदकुमार गायकवाड आणि अमिता देशमुख उपस्थित होते.

See also  स्वच्छतेच्या दुर्गा सांभाळताहेत पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेची धुरा!
  • Related Posts

    फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!

    कामावर जाताना काळाचा घाला; अपघातानंतर डंपरचालक पसार, फुरसुंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पुणे-सासवड मार्गावरील फुरसुंगी येथे भरधाव हायवा डंपरने दुचाकीला पाठीमागून…

    अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी

    अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे | …

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!

    फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!

    थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!

    थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!

    अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी

    अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ;  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी

    दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

    दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

    खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!