खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

 पिस्तुलाची नळी तोंडात घालून जीवे मारण्याची धमकी; खून, दरोड्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद

काशिनाथ शिंदे

पुणे: खंडणीच्या उद्देशाने व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण करत पिस्तुलाची नळी तोंडात घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेला कुख्यात गुन्हेगार तुषार हंबीर याला स्थानिक गुन्हे शाखेने फुरसुंगी परिसरातून अटक केली आहे. या कारवाईमुळे अपहरण प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

३ मार्च २०२६ रोजी कापूरहोळ-नारायणपूर रस्त्यावर व्यावसायिक महेश दळवी यांचा मुलगा पृथ्वीराज दळवी याचे पाच ते सहा जणांनी कारमधून अपहरण केल्याचा आरोप आहे. अपहरणानंतर आरोपींनी पृथ्वीराज याला मारहाण केली. तसेच पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या तोंडात पिस्तुलाची नळी घालत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तुषार हंबीर फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा शोध घेत फुरसुंगी परिसरातून त्याला ताब्यात घेत अटक केली.

दरम्यान, तुषार हंबीर याच्याविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या अपहरण प्रकरणात त्याच्या अटकेमुळे इतर सहभागी आरोपींचा शोध आणि गुन्ह्याच्या पुढील तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

See also  आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत डीवायपीसीओई आणि पीसीसीओईआर विजयी
  • Related Posts

    दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

    ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक-२०२६’ने राष्ट्रीय स्तरावर गौरव; एनआयएमधील उल्लेखनीय सेवेची दखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्ननवी दिल्ली : दहशतवादाशी संबंधित संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल…

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    अनिल शेवाळे, दौलत साळवे, शंकर इंदलकर आणि मनोज खंडाळे यांचा पोलीस सेवेतील प्रदीर्घ प्रवास पूर्ण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपोलीस दलात अनेक वर्षे कर्तव्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

    दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

    खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

    कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम

    कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम

    पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!

    पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!

    कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात

    कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात