आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत डीवायपीसीओई आणि पीसीसीओईआर विजयी

मुलांच्या गटात ताथवडे आयसीसीएस उपविजेता; मुलींच्या गटात आकुर्डी पीसीसीओईला दुसरे स्थान

काशिनाथ शिंदे

पिंपरी, पुणे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि रावेत येथील पीसीसीओईआर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डीवायपीसीओई) संघाने, तर मुलींच्या गटात रावेत येथील पीसीसीओईआर संघाने विजेतेपद पटकावले.

मुलांच्या अंतिम सामन्यात डीवायपीसीओई, आकुर्डी संघाने ताथवडे येथील इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स (आयसीसीएस) संघाचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. निगडी येथील पीसीसीओई संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

मुलींच्या अंतिम सामन्यात रावेत येथील पीसीसीओईआर संघाने आकुर्डी येथील पीसीसीओ संघाचा पराभव करत विजेतेपद मिळविले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

मुलांच्या उपांत्य फेरीत डीवायपीसीओई संघाने राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचा, तर आयसीसीएस ताथवडे संघाने पीसीसीओईचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. मुलींच्या उपांत्य सामन्यात पीसीसीओईआरने डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी आणि पीडीईए कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुलांच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १८ महाविद्यालयांचे संघ, तर मुलींच्या स्पर्धेत आठ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. अक्षय काशीद आणि डॉ. गणेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभ प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. गणेश चव्हाण आणि निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल कमलापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईआरचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मिलिंद थोरात यांनी केले.

See also  आठवड्यात खड्डे बुजवा; अन्यथा रस्त्यावर उतरू!" – विनोद वरखडे यांचा महापालिकेला इशारा

यशस्वी संघांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.

अंतिम निकाल :

मुले :

प्रथम – डीवायपीसीओई, आकुर्डी

द्वितीय – आयसीसीएस, ताथवडे

तृतीय – पीसीसीओई, निगडी

मुली :

प्रथम – पीसीसीओईआर, रावेत

द्वितीय – पीसीसीओई, आकुर्डी

तृतीय – डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!