काशिनाथ शिंदे
पिंपरी : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या.
ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ मार्गदर्शक संदीपान झोंबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत सचिवपदी प्रा. उत्तम सकटे, महिला अध्यक्षपदी सौ. दीपाली लोंढे, कार्याध्यक्षपदी शिवाजी खडसे, खजिनदारपदी भाऊ कसबे, तर उपाध्यक्षपदी संजय साठे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वाचे मा. नाना कसबे, माजी अध्यक्ष डी. पी. खंडाळे, सचिव प्रसाद केसरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उषामाई कांबळे, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाचे माजी अध्यक्ष संजय धुतडमल, राजू आवळे, सागर चव्हाण आणि लोकसेवक युवराज दाखले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार, सामाजिक समता आणि प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






