अनिल शेवाळे, दौलत साळवे, शंकर इंदलकर आणि मनोज खंडाळे यांचा पोलीस सेवेतील प्रदीर्घ प्रवास पूर्ण
काशिनाथ शिंदे
पोलीस दलात अनेक वर्षे कर्तव्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावणारे चार पोलीस अधिकारी आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
यामध्ये सहायक पोलीस आयुक्त अनिल शेवाळे (एटीएस, पुणे), सहायक पोलीस आयुक्त दौलत साळवे (एटीएस, मुंबई), सहायक पोलीस आयुक्त शंकर इंदलकर (मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) मनोज खंडाळे (डीटीएस, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक) यांचा समावेश आहे.
पोलीस दलातील त्यांचा प्रदीर्घ सेवाप्रवास, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि खाकी वर्दीचा राखलेला सन्मान हा सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
“खाकी वर्दीचा केला सन्मान, बाळगला कर्तव्याचा अभिमान!”
कर्तव्य बजावताना दाखवलेली निष्ठा, शिस्त आणि समर्पण यांना मनापासून सलाम! चारही अधिकारी मित्रांना सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि आनंदाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹💐






