कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम

खेड तालुक्यातील रामनगर-कडूस येथे आदिवासी व कष्टकरी महिलांना साड्यांचे वाटप; १२ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

काशिनाथ शिंदे

खेड (प्रतिनिधी) : दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील वंचित आणि कष्टकरी घटकांसोबत वाटून घेण्यातच सणाचे खरे समाधान आहे, हा माणुसकीचा संदेश देत आनंदी मैत्री प्रतिष्ठान, चिंचवड यांच्या वतीने खेड तालुक्यातील रामनगर, कडूस येथे आदिवासी व कष्टकरी महिलांना दिवाळीनिमित्त साड्यांचे वाटप करण्यात आले.

वर्षभर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काबाडकष्ट करणाऱ्या महिलांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीच्या सणात प्रत्येकाच्या घरात आनंदाचा प्रकाश पोहोचावा, या भावनेतून प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आयोजित केला.

आनंदी मैत्री प्रतिष्ठान गेल्या १२ वर्षांपासून ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, शैक्षणिक साहित्यवाटपासाठी तसेच महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण यांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देतानाच त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील आहे.

‘मदत किती मोठी आहे, यापेक्षा ती किती आपुलकीने केली जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या छोट्याशा कृतीतून एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असेल, तर त्यापेक्षा मोठे समाधान दुसरे नाही,’ ही भावना या उपक्रमामागे असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

या उपक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश लुंकड यांच्यासह विकास पाटील, बाबू दगाबाज, बाळासाहेब सातकर, योगिता लुंकड, आदित्य शिंदे, सुजाता दगाबाज आणि कविता पाटील उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत जगताप सर, शिक्षक सहकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, हीच खरी दिवाळी’ हा विचार प्रत्यक्ष कृतीतून जपत आनंदी मैत्री प्रतिष्ठानने सामाजिक जाणीव, माणुसकी आणि आपुलकीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

See also  पिंपरी चिंचवड महोत्सव पुन्हा नव्या दिमाखात; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग
  • Related Posts

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    अनिल शेवाळे, दौलत साळवे, शंकर इंदलकर आणि मनोज खंडाळे यांचा पोलीस सेवेतील प्रदीर्घ प्रवास पूर्ण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपोलीस दलात अनेक वर्षे कर्तव्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे…

    खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

     पिस्तुलाची नळी तोंडात घालून जीवे मारण्याची धमकी; खून, दरोड्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: खंडणीच्या उद्देशाने व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

    खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

    कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम

    कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम

    पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!

    पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!

    कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात

    कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात

    भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट

    भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट