पिंपरी चिंचवड महोत्सव पुन्हा नव्या दिमाखात; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

काशिनाथ शिंदे

पिंपरी : शहराच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणारा आणि काही काळ खंडित झालेला ऐतिहासिक ‘पिंपरी चिंचवड महोत्सव’ आता नव्या ऊर्जा आणि दिमाखात पुन्हा सुरू होणार आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण शहराचा ‘आपला महोत्सव’ म्हणून हा सांस्कृतिक सोहळा साकारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

शहरातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि नागरिकांना दर्जेदार सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेता यावा, या उद्देशाने महोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी महापौर रवीभाऊ लांडगे, आमदार अमित गोरखे आणि आयोजकांनी पुढाकार घेतला आहे.

या महोत्सवात कला क्षेत्राशी संबंधित तसेच शहराच्या विकासात योगदान देणारे आमदार महेश लांडगे, अण्णासाहेब बनसोडे, शंकर जगताप, आमदार उमा खापरे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, तसेच उपमहापौर शर्मिला बाबर, पक्षनेते, गटनेते आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी झळाळी देणारा हा महोत्सव शहरातील विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. महोत्सवाचे स्वरूप, कार्यक्रमांची रूपरेषा आणि आयोजनाची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

See also  संतोष सौंदणकर यांच्या पुढाकारातून चिंचवडमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा कट्टा, वाचनालयाचे लोकार्पण
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!