धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चाचा एल्गार; ५९ वंचित पोटजातींना न्याय देण्याची मागणी

काशिनाथ शिंदे

धाराशिव : अनुसूचित जातींच्या आरक्षणात अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करण्यासाठी धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. अनुसूचित जातीतील दीर्घकाळ आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या ५९ पोटजातींना न्याय मिळावा आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा हक्क मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

आरक्षणाचा लाभ काही मोजक्या घटकांपुरता मर्यादित न राहता अनुसूचित जातीतील सर्व वंचित घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी मांडली. लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क, आरक्षणाच्या लाभाचे समान वाटप आणि वंचित पोटजातींना न्याय या मागण्यांसाठी धाराशिवमध्ये हा एल्गार पुकारण्यात आला.

दरम्यान, आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करणारा गटही सक्रिय असून, या निर्णयाविरोधात ‘संविधान बचाव मोर्चा’ काढण्याची भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात सामाजिक आणि राजकीय पातळीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे.

“वंचितांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार”, असा निर्धार उपवर्गीकरण समर्थकांकडून व्यक्त करण्यात आला.

See also  "गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित करा!" ताम्हिणी-भोर-वरंधा घाट रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मुख्यमंत्र्यांकडे
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!