दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे

काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड

देहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे-डॉल्बी साऊंड सिस्टीम, लेझर लाईट आणि ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साधनांचा वापर करणाऱ्या आयोजक तसेच चालक-मालकांवर देहूरोड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवरही कारवाई करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी उत्सव व सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ध्वनीक्षेपकांचा विहित वेळेपेक्षा अधिक काळ तसेच विहित क्षमतेपेक्षा जास्त वापर करण्यास बंदी आहे.

या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील युवा शक्ती प्रतिष्ठान एम.बी. कॅम्प देहूरोड, सागर लांबे यूथ फाउंडेशन देहूरोड, गजमुख मित्र मंडळ तळवडे गावठाण आणि हनुमान स्पोर्ट्स क्लब तळवडे पुणे या सार्वजनिक मंडळांविरोधात पोलिसांनी स्वतंत्रपणे चार गुन्हे दाखल केले आहेत.

दहीहंडी कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात डीजे-डॉल्बी साऊंड सिस्टीम, लेझर लाईट तसेच ध्वनीप्रदूषण करणारी साधने वापरणे आणि नृत्यांगनांकडून अश्लील हावभाव करणे, अशा प्रकारे न्यायालयीन आदेश व पोलिसांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.

गणेशोत्सवासाठी पोलिसांचा इशारा

दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलिसांनी सार्वजनिक मंडळांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम, लेझर लाईट तसेच ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साधनांचा वापरकरता पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर दहीहंडीप्रमाणेच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

See also  पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; रेड झोनसह प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

ही कारवाई परिमंडळ-८ च्या पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!