कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड: कामगार, कष्टकरी आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देणारे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात भोसले यांना स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित या विशेष सन्मान सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पद्मश्री गिरीश प्रभुणे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी यशवंतभाऊ भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार संघाने केलेली निवड योग्य असल्याचे मत व्यक्त केले.

३५ वर्षे कामगारांच्या न्यायासाठी संघर्ष

यशवंतभाऊ भोसले यांनी तीन दशकांहून अधिक काळ कष्टकरी, कामगार आणि श्रमिकांच्या न्याय्य मागण्या, सुरक्षितता, योग्य वेतन आणि कायदेशीर हक्कांसाठी लढा दिला आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभरातील कामगारांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.

कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधतानाच कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विविध पातळ्यांवर दिलेला त्यांचा लढा कामगार चळवळीसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

तळागाळातील कामगारांना न्याय मिळवून देणारे अभ्यासू, लढाऊ आणि आक्रमक नेतृत्व म्हणून यशवंतभाऊ भोसले यांची महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि कामगार चळवळीतील योगदानाचा गौरव म्हणून हा विशेष सन्मान करण्यात आला.

See also  शिंदे गटाला सोडचिठ्ठी; सप्पागुरूंची ‘घरवापसी’!

“आयुष्यातील अत्यंत आठवणीत राहणारा आणि प्रदीर्घ संघर्षाची पावती देणारा हा क्षण आहे,” अशी भावना यशवंतभाऊ भोसले यांनी सन्मान स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास राजकीय संपादिका मृणालिनी नानिवडेकर, दैनिक पुढारीचे संपादक सुनील माळी, न्यूज १८ मराठीचे सहसंपादक विशाल परदेशी, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार राज काची आणि लेट्सअप पुणेचे संपादक योगेश कुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘आमदारांचे हेडमास्टर’ या विषयावर प्रकट मुलाखत घेण्यात आली. विविध मुद्द्यांवर झालेल्या या संवादाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एस.एम.बी.पी. स्कूलचे अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, ऑटो संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे, ‘दान से उडान’चे संस्थापक रवी घाटे आणि आवटी ग्रुपचे अध्यक्ष बाबासाहेब आवटी यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

नेटके नियोजन

हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार आणि प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी नियोजन केले.

कामगारांच्या हक्कांसाठी ३५ वर्षे अविरत लढा देणाऱ्या यशवंतभाऊ भोसले यांचा झालेला हा गौरव राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला. सन्मानाबद्दल आयोजक आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!