७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

कुणाल मार्केटमधील भीषण आगीत दाखविले प्रसंगावधान; २० वर्षीय आर्याच्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत प्रसंगावधान राखत सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कु. आर्या विजय कांबळे (वय २०) हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान करण्यात आला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या सुरक्षिततेसाठी धावून जाणाऱ्या आर्याच्या धाडसाचे सभागृहात कौतुक करण्यात आले.

चिंचवडमधील कुणाल मार्केट इमारतीमध्ये सुमारे ४० दुकाने आणि ३८ सदनिका आहेत. पहाटे दीडच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे लक्षात येताच आर्या कांबळे हिने तातडीने आरडाओरडा करून रहिवाशांना सावध केले. तसेच, नागरिकांना सुरक्षिततेसाठी इमारतीच्या टेरेसवर जाण्याचे आवाहन केले आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. टेरेसवर अडकलेल्या नागरिकांना शेजारील इमारतीत सुरक्षितपणे हलविण्यात आले. आर्याने वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचविण्यास मदत झाली.

कु. आर्या कांबळे ही डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी येथे डिझाइन विषयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तिने दाखविलेली समयसूचकता, धैर्य आणि सामाजिक बांधिलकी यामुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या या सन्मानप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुलदीप जंगम यांच्यासह अन्य पदाधिकारी, नगरसदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

आर्या कांबळे हिने संकटाच्या प्रसंगी दाखविलेली धाडसी वृत्ती ही समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे उदाहरण ठरली आहे. तिच्या या अतुलनीय कार्याचा गौरव करून महानगरपालिकेने तिच्या धैर्याला सन्मानाची सलामी दिली.

See also  ⚡ हरित ऊर्जा परिवर्तनातील महाराष्ट्राचा डंका! राष्ट्रीय परिषदेत महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा विशेष सन्मान
  • Related Posts

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    रस्ते, आरोग्य, स्वच्छतागृहे आणि नागरी सुविधांच्या कामांना मंजुरी; शहरातील पायाभूत सुविधा बळकट होणार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी महानगरपालिकेच्या स्थायी…

    राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान

    जर्मनीत जाण्याची मिळाली सुवर्णसंधी; पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : नवी दिल्ली येथे झालेल्या १२ व्या ‘इन्स्पायर मानक’ राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात आपल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान

    राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान

    निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा

    निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा

    उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराची संधी; चिंचवडमध्ये देशातील पहिले ‘सीड’ केंद्र सुरू!

    उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराची संधी; चिंचवडमध्ये देशातील पहिले ‘सीड’ केंद्र सुरू!

    किल्ले उभारणीतून शिवइतिहासाचा जागर! पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर चषक भव्य किल्ले बनवा स्पर्धा

    किल्ले उभारणीतून शिवइतिहासाचा जागर! पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर चषक भव्य किल्ले बनवा स्पर्धा