उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराची संधी; चिंचवडमध्ये देशातील पहिले ‘सीड’ केंद्र सुरू!

एसकेएफ इंडियाचा सीएसआर उपक्रम; पहिल्या टप्प्यात १०० युवकांना ३०० तासांचे प्रशिक्षण – महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते शुभारंभ

काशिनाथ शिंदे

पिंपरी : उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि एसकेएफ इंडिया (इंडस्ट्रियल) लिमिटेडच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) देशातील पहिले ‘एसकेएफ एम्प्लॉयबिलिटी अँड आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट (सीड)’ केंद्र चिखलीतील जाधववाडी येथे सुरू करण्यात आले. महापौर रवी लांडगे यांच्या उपस्थितीत या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

या केंद्राच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १०० युवकांना ३०० तासांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. शॉप फ्लोअर टेक्निशियन आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रीशियन या औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाच्या पदांसाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाणार आहे. प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षणासोबतच उत्पादन क्षेत्रातील सुरक्षित कार्यपद्धती, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, कार्यस्थळावरील कौशल्ये, डिजिटल साक्षरता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) प्राथमिक ओळख करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठीही सहाय्य केले जाणार आहे.

किमान दहावी, बारावी, आयटीआय तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम खुला आहे. उत्पादन क्षेत्रातील रोजगारामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष संपर्क आणि जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, सहआयुक्त मनोज लोणकर, मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, विष्णू साबळे, विक्रम आळोखे आणि सोमनाथ शिंदे उपस्थित होते.

एसकेएफतर्फे व्यवस्थापकीय संचालक सुजीथ पै, कंपनी व्यवस्थापक प्रशांत हांडे, सीएसआर व शाश्वतता प्रमुख शशी शेट्टी, सीएसआर प्रमुख मयूर देशमुख आणि संवाद प्रमुख प्रियंका दास उपस्थित होते. टाटा स्ट्राइव्हतर्फे अनिता राजन, प्रदीप लिंगावत, व्यंकट रायडू, श्वेता बक्शी, अक्षय शेट्टी, प्रणोती आवलेकर आणि रमेश बलवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली! सद्गुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही; डॉ. संजय उपाध्ये यांचे प्रतिपादन

एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुजीथ पै म्हणाले की, भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधांबरोबरच कुशल आणि आत्मविश्वासाने काम करणारे मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘सीड’ केंद्राच्या माध्यमातून उद्योग, प्रशासन आणि विकास क्षेत्रातील भागीदारांना एकत्र आणून युवकांना प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षण, डिजिटल व एआयविषयक ज्ञान, मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आणि रोजगारासाठी आवश्यक सहाय्य दिले जाणार आहे. युवकांच्या आकांक्षांना रोजगारक्षमतेत रूपांतरित करून त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमात महापालिका संस्थात्मक पायाभूत सुविधा आणि स्थानिक पातळीवरील सहकार्य उपलब्ध करून देणार आहे. टाटा स्ट्राइव्ह युवकांचे कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगारक्षमता विकासासाठी योगदान देणार असून, बॉश इंडिया फाउंडेशन उद्योगमानकांनुसार अभ्यासक्रम, प्रशिक्षक विकास आणि प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन करणार आहे. या भागीदारीतून युवकांना उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजांनुसार प्रशिक्षित करण्यावर भर दिला जाणार आहे.

टाटा स्ट्राइव्हचे मुख्य परिचालन अधिकारी अमेया वंजारी यांनी कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योगांच्या गरजांमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. उद्योगांचा अनुभव, प्रशासनाचे सहकार्य आणि टाटा स्ट्राइव्हचे प्रशिक्षण क्षेत्रातील योगदान यांचा समन्वय साधणारे ‘सीड’ केंद्र हे सहकार्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर रवी लांडगे म्हणाले की, शहराची औद्योगिक प्रगती ही स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि विकासाच्या संधी निर्माण करणारी असली पाहिजे. एसकेएफचा ‘सीड’ उपक्रम म्हणजे युवकांच्या भविष्यामध्ये केलेली महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे. युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार व उपजीविकेचे साधन निर्माण करता आले, तर समाज आणि देश अधिक सक्षम होईल.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी युवकांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य विकासाला उद्योगांच्या गरजांची जोड देणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘सीड’ केंद्राच्या माध्यमातून महापालिका आणि उद्योग यांच्या भागीदारीत प्रशिक्षणापासून रोजगारापर्यंतचा मार्ग उपलब्ध होत आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन देशाच्या औद्योगिक प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

See also  तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ रावेतमध्ये सुरू

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता राजन यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती गोरे यांनी केले, तर मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

  • Related Posts

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    रस्ते, आरोग्य, स्वच्छतागृहे आणि नागरी सुविधांच्या कामांना मंजुरी; शहरातील पायाभूत सुविधा बळकट होणार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी महानगरपालिकेच्या स्थायी…

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    कुणाल मार्केटमधील भीषण आगीत दाखविले प्रसंगावधान; २० वर्षीय आर्याच्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान

    राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान

    निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा

    निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा

    उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराची संधी; चिंचवडमध्ये देशातील पहिले ‘सीड’ केंद्र सुरू!

    उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराची संधी; चिंचवडमध्ये देशातील पहिले ‘सीड’ केंद्र सुरू!

    किल्ले उभारणीतून शिवइतिहासाचा जागर! पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर चषक भव्य किल्ले बनवा स्पर्धा

    किल्ले उभारणीतून शिवइतिहासाचा जागर! पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर चषक भव्य किल्ले बनवा स्पर्धा