तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ रावेतमध्ये सुरू

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते भव्य उद्घाटन; राजकीय, सामाजिकपत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

काशिनाथ शिंदे

पिंपरी उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात वेळ घालविण्याऐवजी काळाची गरज ओळखून शुभम गोरे आणि प्रणिता गोरे या नवदांपत्याने उद्योजकतेची वाट निवडली आहे. वेगाने विकसित होत असलेल्या रावेत, शिंदे वस्ती परिसरातील राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी येथे तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ नुकतेच मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आले.

‘कॅफे अरोमा’चे भव्य उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कॅफे अरोमा’चे संचालक शुभम गोरे आणि प्रणिता गोरे यांनी सांगितले की, रावेत परिसरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रशस्त वातावरणात उत्तम आदरातिथ्य सेवा देण्याचा आपला संकल्प आहे. कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी रावेत, शिंदे वस्ती, उड्डाणपुलाजवळील राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी येथील ‘कॅफे अरोमा’ला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक अपर्णा डोके, अनंत कोऱ्हाळे, शेखर चिंचवडे, आशाताई सूर्यवंशी, ऐश्वर्या तरस, रश्मी कातळे, पल्लवी वाल्हेकर, धम्मपाल तंतरपाळे, माजी नगरसेवक सचिन चिंचवडे, राजेंद्र गावडे, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र साळुंके आदी उपस्थित होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते बापू कातळे, चिंचवड व्यापारी संघटनेचे प्रमुख राजू चिंचवडे, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत भोंडवे, महापालिका सेवानिवृत्त अधिकारी पी. बी. गायकवाड, उद्योगपती सुमित वाढोवकर, सुशील वाढोवकर, अमोल भोंडवे, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे, रेहान सय्यद, संतोष जराड, गणेश शिंदे, सोशल मीडिया अध्यक्ष सूरज साळवी, पत्रकार देवा भालके, दिलीप देहाडे, जितेंद्र गवळी, शबनम सय्यद, अमोल डंबाळे, सोमनाथ काळे, भीमराव बरकडे यांच्यासह राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटीचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

See also  प्रियकरासोबत राहणारी पत्नी डोळ्यात खुपली; पतीने डोक्यात दगड घालून संपवले!

उपस्थित मान्यवरांनी शुभम गोरे आणि प्रणिता गोरे यांना व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

  • Related Posts

    पीसीसीओईमध्ये प्रथम वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य वाढवावे; डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

    पीसीसीओईमध्ये प्रथम वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचा उत्साहात स्वागत समारंभ; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी: महाविद्यालयीन जीवन हे केवळ शैक्षणिक ज्ञान मिळविण्यापुरते मर्यादित…

    ड्रायव्हर डे उत्साहात साजरा; विनोद वरखडे यांच्या पुढाकारातून सुरक्षित वाहनचालनेचा संदेश

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : वाहनचालकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासोबतच सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक शिस्तीचा संदेश देण्यासाठी ड्रायव्हर डे उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे यांच्या सहभागाने…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ रावेतमध्ये सुरू

    तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ रावेतमध्ये सुरू

    पीसीसीओईमध्ये प्रथम वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य वाढवावे; डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

    पीसीसीओईमध्ये प्रथम वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य वाढवावे; डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

    ड्रायव्हर डे उत्साहात साजरा; विनोद वरखडे यांच्या पुढाकारातून सुरक्षित वाहनचालनेचा संदेश

    ड्रायव्हर डे उत्साहात साजरा; विनोद वरखडे यांच्या पुढाकारातून सुरक्षित वाहनचालनेचा संदेश

    दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

    दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!