सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!

एकता दौड, व्याख्यान आणि संगीतमय देशभक्तीपर कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

काशिनाथ शिंदे

पिंपरी : देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत पिंपरी-चिंचवड शहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’ला उत्साहात सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पर्वांतर्गत एकता दौड, व्याख्यान आणि संगीतमय देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या पर्वातील एकता दौडला भक्ती-शक्ती चौकातून सुरुवात झाली. निगडी उड्डाणपूल, काचघर, भेळ चौक असा मार्ग पार करीत दौडचा समारोप पुन्हा भक्ती-शक्ती चौक येथे करण्यात आला. यावेळी नागरिकांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले.

दौड सुरू होण्यापूर्वी उपस्थितांनी राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्याची सामूहिक शपथ घेतली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या अखंड भारताची एकता टिकवून ठेवण्यासाठी तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

या उपक्रमात क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, माजी नगरसदस्य नामदेव डाके, उपआयुक्त पंकज पाटील, सहशहर अभियंता बापू गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

सायंकाळी ‘वर्तमान भारतासाठी सरदार पटेल यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर प्रा. महिपतराव ठाकूर यांचे व्याख्यान झाले. त्यांनी सरदार पटेल यांच्या विचारांचे आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘अपरिचित सरदार गाथा’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.

महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त पंकज पाटील यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

See also  ४६ वर्षांची भगवी निष्ठा! वादळे आली, फितुरी झाली... पण रमेशभाऊंनी विचारांचा झेंडा कधीच खाली ठेवला नाही
  • Related Posts

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    काशिनाथ पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री उशिरा अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सहा बांगलादेशी महिला आढळून आल्या असून,…

    वाढदिवसाच्या पार्टीसाठी लोणावळ्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

    सुकटा शिवारातील लोखंडी रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकरला अटक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नभूम / धाराशिव : पवनचक्कीच्या वादातून सुकटा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!

    सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!

    महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!

    महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!

    मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!

    मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!

    महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई

    महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई

    फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!

    फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!

    थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!

    थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!