अवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटके

 

पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे

पिंपरी : आळंदी परिसरातील चैन चोरीच्या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवघ्या काही तासांत छडा लावत तीन आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन दोन अज्ञात इसमांनी जबरदस्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला.

 

१३ जून रोजी पथकाला आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चैन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैष्णव शरद कदम (वय २०), सचिन जालिंदर कदम (वय ४२) आणि विजय ज्ञानेश्वर कदम (वय ३३, सर्व रा. निरगुडी, ता. हवेली, जि. पुणे) यांचा समावेश आहे.

 

पोलिसांनी आरोपींकडून ३३.८१० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत ४ लाख ९५ हजार रुपये) तसेच ८ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त केले. एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ही कामगिरी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, पोलीस निरीक्षक महेश खांडे तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने पार पाडली.

See also  राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!