सिद्धीविनायक ज्युनिअर कॉलेजमध्ये पुष्पवृष्टी, औक्षणाने अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

काशिनाथ शिंदे : चिखली

 

चिखली येथील सिद्धीविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. तसेच पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मारुती जाधव, अध्यक्षा निर्मला जाधव, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभासह परिचय सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना बारावीच्या अभ्यासाचे नियोजन, नियमित अध्ययनाचे महत्त्व तसेच वर्षभर सातत्याने तयारी करून नीट, जेईई आणि सीईटीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आवश्यक बाबींचे मार्गदर्शन केले.

 

नवीन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात आनंददायी वातावरणात व्हावी, या उद्देशाने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.

 

संस्थेच्या अध्यक्षा निर्मला जाधव यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन, नियमित अभ्यास आणि शिस्त यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नीट, जेईई, सीईटीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध तयारी करण्याचा सल्ला देत महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  लंडनमध्ये लपलेल्या निलेश घायवळला आणखी मोठा धक्का! घायवळ टोळीवर पोलिसांचा आणखी एक घाव
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!