पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी; मनसेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

काशिनाथ शिंदे :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी कथितरीत्या केलेल्या अवमानकारक व धमकीवजा वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांना निवेदन देऊन तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिलेल्या निवेदनात, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे तसेच पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून, अशा वक्तव्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, असे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात संबंधित खासदारांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

यावेळी मनसेचे उपविभाग अध्यक्ष निलेश नेटके, संतोष यादव, सागर बहुले, नारायण पठारे, जॉकी सबेस्टीन, प्रशांत चनाल आणि वैभव फाळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

See also  अश्रूंनी उजळला कॅण्डल मार्च... केतन, तुला न्याय मिळालाच पाहिजे!
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान