पुणे RTO ची अपघातांवर लगाम घालण्यासाठी मोठी मोहीम; ८ विशेष पथके रस्त्यावर उतरली!

काशिनाथ शिंदे :शहरातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरभर ८ स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, ही पथके विविध भागांत नियमित तपासणी करून वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार आहेत.

शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेदरकार वाहनचालक आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष पथकांना नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या मोहिमेदरम्यान ओव्हरस्पीडिंग, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृतीही केली जाणार आहे.

RTO प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

See also  लंडनमध्ये लपलेल्या निलेश घायवळला आणखी मोठा धक्का! घायवळ टोळीवर पोलिसांचा आणखी एक घाव
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान