राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; निगडीत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

काशिनाथ   शिंदे पिंपरी,  : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहर व प्रभाग क्रमांक १३ निगडी यांच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सद्गुरू दत्त उद्यान, यमुनानगर येथे उत्साहात पार पडला.

यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रभागातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.

या प्रसंगी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेविका सौ. अश्विनी सचिन चिखले, शाखाध्यक्ष सागर बहुले, रोहित काळभोर, मनसे शहर सरचिटणीस मनोज लांडगे, राजू साळवे, आकाश कांबळे, वैभव फालके, अमोल सकट, स्वप्निल महांगरे, विठ्ठल रोमाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

See also  चाकण एमआयडीसीतील अतिक्रमणांवर हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांचा ‘अल्टिमेटम’!
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!