घरासमोर पावसाचे पाणी… नळात पिण्याचे पाणी नाही! घरकुल चौकात नागरिकांचा संताप; चारही बाजूंनी रास्ता रोको”

 

 

 

काशिनाथ    शिंदे    पिंपरी चिंचवड

घरकुल चौक परिसरात पावसाच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. संतप्त नागरिकांनी चारही बाजूंनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

“घरासमोर पावसाचे पाणी साचलेले आहे, मात्र नळातून पिण्याचे पाणीच येत नाही,” अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. दरवर्षी पावसाळ्यात घरकुल परिसर जलमय होत असून, वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात अधिकारी जेसीबीवरून पाहणी करून निघून जातात; मात्र सोसायट्यांमध्ये साचलेले पाणी तसेच राहते. त्यामुळे डासांची उत्पत्ती, दुर्गंधी आणि विविध साथीच्या आजारांचा धोका वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

“मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल घरकुलवासीयांनी उपस्थित करत तातडीने जलनिस्सारण व्यवस्था सुधारावी, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी केली.

दरम्यान, आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून नागरिकांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

See also  बावधनमध्ये शस्त्रसाठ्यासह दोघे जेरबंद; दोन गावठी पिस्तुले, काडतुसे आणि वाहनासह १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!