थेरगावात भरदिवसा रक्तरंजित थरार! ‘तुझ्या पोराआधी तुझेच मुंडके कापतो’ म्हणत पेंटरवर जीवघेणा चाकू हल्ला

काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड

थेरगाव परिसरात भरदिवसा झालेल्या चाकू हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाने आठ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून एका ४३ वर्षीय पेंटरवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने पेंटरसह त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरवरही चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी (११ जुलै) सकाळी सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील पवारनगर, गल्ली क्रमांक ३ मधील खबर पान शॉपसमोर घडली.

याप्रकरणी अविनाश अजिनाथ बाबर (वय ४३, व्यवसाय पेंटर, रा. आदर्श कॉलनी, थेरगाव) यांनी फिर्याद दिली असून, अभि ऊर्फ अभिषेक कोळेकर (वय २५, रा. पडवळनगर, थेरगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी आरोपी अभि कोळेकर आणि धन्या यांच्यात वाद झाला होता. या भांडणात फिर्यादी बाबर यांचा मुलगा चेतन याने मध्यस्थी करत वाद मिटवला होता. याचाच राग आरोपीच्या मनात होता. आरोपीने यापूर्वीच बाबर यांना त्यांच्या मुलाचे मुंडके कापून हातात देण्याची धमकी दिली होती. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वादही झाला होता.

शनिवारी सकाळी अविनाश बाबर हे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर विजय भोईर यांच्यासोबत बिगारी कामासाठी मजूर शोधत होते. ते मोटारसायकलवर बसले असताना आरोपी तेथे आला. मोबाईल क्रमांक मागण्याच्या बहाण्याने त्याने बाबर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर अचानक “तुझ्या पोराच्या आधी तुझेच मुंडके कापतो,” अशी धमकी देत आरोपीने धारदार चाकूने बाबर यांच्यावर सपासप वार केले. हल्ल्यात बाबर गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपीने विजय भोईर यांच्या पाठीवरही चाकूने वार करून त्यांनाही जखमी केले.

या प्रकरणी वाकड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३५१(२) आणि ३५१(३) अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक गज्जेवार पुढील तपास करीत आहेत.

See also  बसमध्ये राहिला १० वर्षांचा तेजस; PMPML कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने पालकांच्या कुशीत परतला!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!