निकृष्ट खाद्यतेलावर एफडीएचा बुलडोझर! २.९३ कोटींचा साठा जप्त; दोन ऑईल रिफायनिंग युनिट्सचे परवाने निलंबित

काशिनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर

राज्यात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छत्रपती संभाजीनगर येथे निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाविरोधात मोठी धडक कारवाई केली. शहरातील दोनऑईलरिफायनिंगयुनिट्सवरछापेटाकूनतब्बल २.९३ कोटी रुपयांचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित दोन्ही युनिट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

एफडीएच्या तपासणीदरम्यान उत्पादन प्रक्रियेत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. अस्वच्छ वातावरणात उत्पादन, वापरलेले डबे पुन्हा वापरणे, आवश्यक गुणवत्ता तपासणीचा अभाव तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाईचा निर्णय घेतला.

अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून, अहवालानुसार संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

राज्यात निकृष्ट व भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेमुळे अन्नसुरक्षेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा एफडीएने दिला आहे.

See also  दुहेरी प्रवेशावरून विद्यार्थ्यांवर कारवाई का?; विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थी संघटनेचा सवाल
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!