अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

काशिनाथ शिंदे

मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी

परिसरात पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत तब्बल ६६ लाख ३६ हजार रुपये किमतीचा १ किलो ८९६ ग्रॅम हायड्रो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या अटकेमुळे अंमली पदार्थांच्या विक्रीचे जाळे उघड होण्याची शक्यता आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ओमकार राजेंद्र पवार (वय २८) आणि पियुष मधुकर घोंगडे (वय २२) अशी आहेत. २९ ऑक्टोबर रोजी रात्री एमआयडीसी परिसरातील जे. के. इंडस्ट्रियल इस्टेटजवळील पेपर बॉक्स रोड येथे पोलीस गस्त घालत असताना हे दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले.

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १ किलो ८९६ ग्रॅम हायड्रो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत ६६ लाख ३६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी सातारा जिल्ह्यातून मुंबईत गांजाची विक्री करण्यासाठी आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींना हा अंमली पदार्थ कोठून मिळाला, त्याचे वितरण कोणाला केले जाणार होते आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

जप्ती : १ किलो ८९६ ग्रॅम हायड्रो गांजा

किंमत : ६६ लाख ३६ हजार रुपये

अटक : सातारा जिल्ह्यातील दोन तरुण

See also  स्वाईन फ्लूपासून सावध; वातावरणातील बदलामुळे तापाच्या रुग्णांत वाढीची शक्यता
  • Related Posts

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

    काशिनाथ शिंदे पुणे : पुण्यातील मध्यवर्ती सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये २५ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शुभम बनसोडे (वय २५, रा. लोणी…

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    १ ते २० नोव्हेंबरदरम्यान राज्यभर विशेष तपासणी मोहीम; प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सज्ज विनोद वरखडे प्रतिनिधी पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!