सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

काशिनाथ शिंदे

पुणे : पुण्यातील मध्यवर्ती सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये २५ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शुभम बनसोडे (वय २५, रा. लोणी काळभोर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या निकटवर्तीयाशी संबंधित कारचे कनेक्शन समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नेहरू स्टेडियमबाहेर एक मारुती सुझुकी अल्टो कार एकाच ठिकाणी उभी होती. या कारमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी धाव घेत कारची तपासणी केली. यावेळी कारच्या आत शुभम बनसोडे याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, त्याचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावरून न्यायवैद्यक पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. मृत्यूचे नेमके कारण आणि हा घातपात आहे की अन्य काही प्रकार, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी कारच्या मालकीची माहिती तपासली असता धक्कादायक बाब समोर आली. मृतदेह आढळलेली कार कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या निकटवर्तीयाच्या नावावर असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मृत शुभम बनसोडे याच्यावरही यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे आहे.

त्यामुळे जुन्या वैमनस्यातून, आर्थिक व्यवहाराच्या वादातून की गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षातून हा प्रकार घडला, याबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहेत. स्वारगेट पोलिसांनी तपासासाठी पथके तयार केली असून, कारचा मालक, मृत तरुणाचे संपर्क आणि त्याच्या हालचालींची माहिती तपासली जात आहे.

कारमधील मृतदेह आणि गुन्हेगारी टोळीशी जोडले गेलेले कारचे कनेक्शन यामुळे पुण्यातील या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून, पोलिसांच्या तपासातून नेमके सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

See also  चिखलीत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; एमडीसह चार वाहने-मोबाईल जप्त, चौघे गजाआड
  • Related Posts

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    काशिनाथ शिंदे मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपरिसरात पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत तब्बल ६६ लाख ३६ हजार रुपये किमतीचा १ किलो…

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    १ ते २० नोव्हेंबरदरम्यान राज्यभर विशेष तपासणी मोहीम; प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सज्ज विनोद वरखडे प्रतिनिधी पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!