चिखलीत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; एमडीसह चार वाहने-मोबाईल जप्त, चौघे गजाआड

काशिनाथ शिंदे : चिखली पिंपरी चिंचवड

चिखली परिसरात मेफेड्रॉन (एमडी) विक्रीच्या तयारीत असलेल्या चौघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून ८ ग्रॅम ७३ मिलिग्रॅम एमडीसह चारचाकी, दुचाकी, चार मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूणलाख ३८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई ६ ऑगस्ट रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास हरगुडे वस्ती ते स्पाईन रोडकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरील पत्र्याच्या शेडजवळ करण्यात आली.

या कारवाईत समशुद राजाबली शहा (वय २३), साहेबन मोहम्मद इलियास शहा (वय २१), सोहेल कादिर शेख (वय २१) आणि अमिराज जोखुराम कोरी (वय ३३) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८.७३ ग्रॅम एमडी, एक चारचाकी वाहन, एक दुचाकी, चार मोबाईल फोन आणि १२० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुंबईतील हर्ष यादव (केडीसी) याच्याकडून विक्रीसाठी एमडी आणल्याची माहिती चौकशीत आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील पाचव्या आरोपीचा सहभाग आणि ड्रग्ज पुरवठ्याची साखळी तपासली जात आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९८/२०२६ दाखल करण्यात आला असून, एनडीपीएस कायदा कलम८(क),२२(ब)आणि २९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर करीत आहेत.

See also  "चाकणला मेट्रोची गती! पिंपरी-चिंचवड ते औद्योगिक पट्टा जोडणाऱ्या नव्या मार्गावर महा मेट्रोची निर्णायक बैठक"
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!