काशिनाथ शिंदे : मावळ
पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनात शहीद झालेले पवना नगर येथील सौ. कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांच्या स्मृतींना शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आदरांजली वाहण्यात आली.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकांच्या बलिदानाची आठवण ठेवत दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी हुतात्म्यांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.
या कार्यक्रमास माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुऱ्हे, विभागप्रमुख सदानंद भोसले, माजी विभागप्रमुख सुनील इंगुळकर, वाहतूक सेना पुणे तालुकाध्यक्ष अवधूत चव्हाण, सतीश गरुड, वाहतूक सेनेचे तालुका संघटक दिनेश वीर, माजी उपतालुकाप्रमुख कैलास सगळे, माजी सरपंच अनिल भालेराव, पवन मावळ विभागप्रमुख सुरेश गुप्ता, कार्यालयप्रमुख सनी मोहिते, शाखाप्रमुख उमेश ठाकर, दत्ताभाऊ दाभाडे, विभाग संघटक अंकुश वाघमारे, लहू जाधव, सदानंद पिल्लाने, युवासेनेचे सतीश गोनते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील हुतात्म्यांचे बलिदान आणि त्यांच्या संघर्षाची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.







