अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती; समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी सौ. दिपाली खाजप्पा केंगारे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवक युवराज दाखले यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
समाजातील वंचित, गोरगरीब घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या दिपाली केंगारे यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी लोकसेवक युवराज दाखले म्हणाले, “दिपाली खाजप्पा केंगारे या अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे समाजकार्य करीत आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि लढाऊ नेतृत्वाचा निश्चितच संघटनेला फायदा होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरातील मातंग समाज अधिक संघटित होईल. महिला भगिनींच्या प्रश्नांना न्याय देण्याबरोबरच युवकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरेल.”
या वेळी सौ. रोहिणी प्रसाद रास्कर, ओबीसी महिला अध्यक्षा, भाजपा पिंपरी-चिंचवड शहर तसेच शिवशाही शासन पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उषामाई कांबळे यांनी दिपाली केंगारे यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दिपाली केंगारे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मातंग समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकसेवक युवराज दाखले
संस्थापक अध्यक्ष – शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेना
पिंपरी-चिंचवड






