मोशी कचरा डेपो मृत्यू प्रकरण तापलं! दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; महापालिकेबाहेर ठिय्या आंदोलन

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड

पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना न्याय मिळावा आणि या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस तसेच विविध संघटनांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पर्यावरण अभियंता संजय कुलकर्णी, महापौर रवी लांडगे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते.

महापौर रवी लांडगे यांनी संबंधित प्रकरणात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, आंदोलन स्थगित झाल्यानंतरही महापालिका प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच विधान परिषद सदस्यांच्या नावानेही घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सागर बहुले, रुपेश पटेकर, बाळा दानवले, शिवसेना उबाठाचे चेतन पवार, काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे आणि सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

See also  "मोशीकरांवर कचऱ्याचा अन्याय थांबवा; प्रत्येक प्रभागात 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प उभारा!" – निखिल बोऱ्हाडे यांचा महापालिकेला सज्जड इशारा
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!