तडीपाराचा आदेश धुडकावला अन् थेट गुन्हे शाखेच्या जाळ्यात! सराईत गुन्हेगाराला युनिट-३ची अचूक कारवाई

काशिनाथ शिंदे: पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ने तडीपार आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत आणखी एक यशस्वी कारवाई करत तडीपाराचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीधन इचके तसेच पोलीस शिपाई निखिल फापाळे आणि तुषार वराडे हे पाहिजे, फरार व तडीपार आरोपींचा शोध घेत होते. यावेळी पोलीस शिपाई निखिल फापाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुनील रमेश इब्राहिम पूरकर(वय २५, रा. सिंहगड कॉलनी, टॉवर लाईन पत्राचाळ, मोरेवस्ती, चिखली, पुणे) यास संभाजी महाराज पुतळ्याजवळ, ओम हॉटेल च्या समोरून बोराडेवाडी मोशी येथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली.

आरोपीविरुद्ध तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी, मारहाण, खंडणी, दरोडा, गंभीर दुखापत, धमकी तसेच अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) अशा विविध स्वरूपाचे सहा गुन्हे यापूर्वी नोंद आहेत.

गुन्हे शाखा युनिट-३च्या या कारवाईमुळे तडीपार आरोपींमध्ये पुन्हा एकदा धाक निर्माण झाला असून शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

See also  राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मातंग समाजाच्या हक्कांसाठी एल्गार; उपवर्गीकरणासह तीन महत्त्वाच्या मागण्या
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!