खड्ड्यांवर महापालिकेचा बुलडोझर! विनोद वरखडे यांच्या पाठपुराव्यानंतर शहरभर रस्ते दुरुस्तीला वेग

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड

पिंपरी : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद शंकरराव वरखडे यांनी केलेल्या मागणीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला होता. देहू-आळंदी रस्ता, चिंचवड स्टेशन परिसर, तळवडे, मोशी-चऱ्होली मार्ग, बोऱ्हाडेवाडी तसेच चिंचवड स्टेशन ते चिखली या भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. याबाबत विनोद वरखडे यांनी महापालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रदीप औटी, भरतशेठ वाळके, अनुराग कुरणे पाटील, अकबर शेख, स्वप्निल चौव्हाण आदी उपस्थित होते. खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

दरवर्षी पावसाळ्यानंतर खड्डे बुजविले जातात; मात्र पावसामुळे भराव वाहून गेल्याने पुन्हा खड्ड्यांची समस्या निर्माण होते. त्यामुळे तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी दर्जेदार आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. विनोद वरखडे यांच्या मागणीनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांमध्ये खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. रस्ते दुरुस्तीमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे

See also  काळेवाडीत गांजा विक्रेत्यावर पोलिसांचा धडक छापा; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!