पार्थ गुरव यांची शिवसेना उपशहर प्रमुखपदी निवड

युवकांना संघटनात्मक जबाबदारी; सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाची दखल

काशिनाथ शिंदे

पिंपरी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड उपशहर प्रमुखपदी पार्थ रमेश गुरव यांची निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पिंपरी-चिंचवड शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.

शिवसेना शहरप्रमुख चेतन पवार यांनी पार्थ गुरव यांच्या निवडीचे स्वागत करत अभिनंदन केले. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना शहर कार्यकारिणीत विविध जबाबदाऱ्या देऊन संघटनात्मक कामाची संधी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पार्थ गुरव हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील रमेश विठ्ठल गुरव हे गंगानगर येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतलेले पार्थ गुरव हे चिंचवड-वाल्हेकरवाडी येथील सुखकर्ता पॅथॉलॉजी लॅबचे संस्थापक संचालक आहेत.

शिवसेनेच्या शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, विभागप्रमुख तसेच पिंपरी विधानसभा समन्वयक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यापूर्वी सांभाळल्या आहेत. गंगानगर प्राधिकरण येथील सिद्धिविनायक मंडळाचे तसेच शिवसेना प्रणित जय भवानी प्रतिष्ठान, आकुर्डी या संस्थेचे सचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत.

सामाजिक क्षेत्रातही पार्थ गुरव यांचा सक्रिय सहभाग आहे. राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड गुरव समाज संस्थेचे कार्याध्यक्ष, बारा बलुतेदार महासंघाचे सदस्य आणि पुणे पॅरामेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.

गेल्या वीस वर्षांपासून शहर पातळीवर शिवजयंती उत्सव तसेच गणेशोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध सामाजिक व मूलभूत प्रश्नांवर शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

पार्थ गुरव यांच्या उपशहर प्रमुखपदी झालेल्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

See also  माय मराठीचा साहित्यवारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज
  • Related Posts

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक