अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठी महापालिका सज्ज!

वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन जवानांसह आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र व जीवरक्षक तैनात

काशिनाथ शिंदे

पिंपरी : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, प्रशिक्षित अग्निशमन जवान, आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र आणि जीवरक्षकांची तैनाती करण्यात आली आहे. यासोबतच कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्रे, निर्माल्य संकलन केंद्रे आणि अन्य आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका सज्ज

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून विविध विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत आणि आवश्यकता भासल्यास त्यांना रुग्णालयात हलविता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित परिचारिका, वॉर्डबॉय आणि रुग्णवाहिका चालकांचा समावेश आहे.

अग्निशमन जवानांसह आपत्कालीन यंत्रणा सज्ज

गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका अग्निशमन विभागाकडून प्रशिक्षित अग्निशमन जवान विसर्जनस्थळी तैनात करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत करता यावी, यासाठी विशेष अग्निशमन वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

याशिवाय आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र आणि जीवरक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही पथके आवश्यकतेनुसार मदत करणार आहेत.

‘अ’, ‘ड’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांत कृत्रिम तलाव

महापालिकेच्या उपलब्ध नोंदीनुसार ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १०, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ११ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात स्पाईन रोड, यमुनानगर; मोहननगर सांस्कृतिक भवन; गणेश तलावाजवळ, सेक्टर २६ प्राधिकरण; तसेच नियोजित महापौर निवास मैदान, सेक्टर २७ प्राधिकरण येथे कृत्रिम हौद असलेली विसर्जन केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

See also  चाकणमध्ये १ कोटी १३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त!

तसेच ठाकरे मैदान, यमुनानगर; स्पाईन रोड, यमुनानगर; विठ्ठल मंदिर, आकुर्डी; सेंट उर्सुला शाळेजवळ, आकुर्डी; दुर्गे चौक, काळभोरनगर; मोहननगर सांस्कृतिक भवन; कै. पांडुरंग उर्फ काकाभाऊ सभागृह, आकुर्डी गावठाण येथे मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आतापर्यंत ४९ हजार ८०३ गणेशमूर्तींचे संकलन-विसर्जन

महापालिकेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार १४ ते २३ सप्टेंबरदरम्यान एकूण ४९ हजार ८०३ गणेशमूर्तींचे संकलन-विसर्जन करण्यात आले आहे. यामध्ये १० हजार १७० पर्यावरणपूरक मूर्ती आणि ३९ हजार ६३३ पीओपी मूर्तींचा समावेश आहे.

२२ हजार ६४७ किलो निर्माल्य संकलित

गणेश विसर्जनादरम्यान निर्माल्य नदी, तलाव अथवा अन्य जलस्रोतांमध्ये जाऊ नये, यासाठी महापालिकेने निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

महापालिकेच्या उपलब्ध नोंदीनुसार २३ सप्टेंबरपर्यंत २२ हजार ६४७.२५ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.

फुले, हार, दुर्वा तसेच अन्य पूजासाहित्य जलस्रोतांमध्ये न टाकता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य संकलन व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य

नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये करावे. जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती आणि निर्माल्याचे योग्य पद्धतीने विसर्जन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महापालिकेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, सुरक्षित विसर्जनस्थळांचा वापर करावा आणि वैद्यकीय, अग्निशमन, जीवरक्षक तसेच अन्य आपत्कालीन पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

  • Related Posts

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!