चाकणमध्ये १ कोटी १३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त!

गुप्त माहितीवरून सहा तास थरारक पाठलाग; ट्रक अडवून मुद्देमाल जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हा

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत चाकण परिसरात तब्बल १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त केला. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणण्यात येत असलेल्या या मालाचा माग काढताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला तब्बल सहा तास थरारक पाठलाग करावा लागला.

१८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता कारवाईला सुरुवात झाली. गुप्त माहितीनुसार संबंधित ट्रक समृद्धी महामार्गाने भिवंडी-ठाणे येथे येणार होता. मात्र, ट्रकने नियोजित मार्ग बदलून संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

मार्ग बदलल्याचे लक्षात येताच संभाव्य मार्गांवर अन्न व औषध प्रशासनाची पथके तैनात करण्यात आली. ठाणे विभागाचे पथक मुरबाडच्या दिशेने, तर पुणे विभागाचे पथक राजगुरुनगर येथे दाखल झाले.

राजगुरुनगर टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी ट्रक आडवा लावून तो थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने ट्रक न थांबवता पुढे दामटला. त्यानंतर सावळे यांनी ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला. अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडविण्यात आला. सुमारे सहा तासांच्या पाठलागानंतर रात्री आठच्या सुमारास ट्रक ताब्यात घेण्यात आला.

ट्रकची झडती घेतली असता महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण १,१३,५४,६०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

असा आहे जप्त केलेला मुद्देमाल

रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला – २९,९५,२०० रुपये

तुळशी रॉयल जाफरानी जर्दा – ९,६०,००० रुपये

तानसेन सुगंधित पानमसाला – २४,९४,८०० रुपये

टी.ओ. प्रिमियम जर्दा – २,६४,६०० रुपये

See also  महिलांसाठी इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये मोफत तांत्रिक प्रशिक्षण

आर.एम.डी. पानमसाला – २६,४०,००० रुपये

ट्रक क्रमांक एमएच १८ बीझेड २३५० – २०,००,००० रुपये

एकूण जप्त मुद्देमाल : १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपये

कारवाईनंतर जप्तीची नोंद, कागदपत्रांची पूर्तता आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अखेर १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली.

पाच जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणात नफीस मेहबूब खान (वय ४०, रा. हरियाणा) याच्यावर वाहनचालक म्हणून, निलेश राठी (रा. खामगाव, जि. बुलढाणा) आणि अरुण पाटील (रा. जळगाव) यांच्यावर मालक/पुरवठादार म्हणून, मे. जे.एम.डी. एंटरप्रायझेस, धुळे यांच्यावर वाहनमालक म्हणून, तर संजय माटा (रा. इंदूर, मध्य प्रदेश) याच्यावर वाहतूकदार म्हणून कारवाई करण्यात आली आहे.

संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरवठा साखळीची चौकशी करण्याची मागणी

हा प्रकार केवळ प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या वाहतुकीपुरता मर्यादित नसून, यामागील पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार आणि संबंधितांचे पूर्वगुन्हे तपासण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे. दोषी आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका), १९९९ अंतर्गत कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित व आरोग्यास घातक अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा गैरप्रकाराबाबत तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रार नोंदणी संकेतस्थळावर तक्रार करता येईल.

  • Related Posts

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक