शासनाच्या योजनांचा लाभ घ्या; शहराच्या विकासातही सहभागी व्हा

‘पिंपरी-चिंचवड महोत्सव’तील लोकसंवाद उपक्रमात विशेष कार्य अधिकारी किरण गायकवाड यांचे आवाहन

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन पात्र नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच शहराच्या विकासासोबतच सांस्कृतिक उपक्रमांमध्येही नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ अंतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद’ उपक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर

महानगरपालिका तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजकल्याण विभागामार्फत महिलांसाठीच्या योजना, निराधार नागरिकांसाठीच्या योजना तसेच शैक्षणिक योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या योजनांचा महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये समावेश करून त्याचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि त्यांचे लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही प्रशासन कटिबद्ध आहे. शासनाच्या विविध विभागांच्या तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर योजनांची माहिती उपलब्ध आहे. नागरिकांनी या संकेतस्थळांना भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले.

सांस्कृतिक उपक्रमांतही नागरिकांचा सहभाग आवश्यक

शहराचे वैभव केवळ भौतिक विकासातून नव्हे, तर सांस्कृतिक समृद्धीतूनही निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नागरिक, कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘सारथी’ ॲपवर समस्या नोंदवा

See also  भोसरी एमआयडीसीत सुरक्षेचा बोजवारा! छतावरून पडून २६ वर्षीय कामगाराचा मृत्यू; कंपनीच्या जबाबदार व्यक्तीवर गुन्हा

नागरिकांच्या विविध अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेचे ‘सारथी’ ॲप उपलब्ध आहे. नागरिकांनी आपल्या समस्या या ॲपवर नोंदवाव्यात. त्याद्वारे संबंधित समस्यांची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य होईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी गझल गायक अशोक गायकवाड यांनी नागरिकांना लोकसंवाद उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. माहिती अधिकारी गणेश फुंदे यांनी प्रास्ताविक करत लोकसंवाद उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे संयोजन उपसंपादक संदीप राठोड, जितेंद्र खंडागळे आणि विशाल तामसीकर यांनी केले. कार्यक्रमास महिला, युवक, युवती तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Related Posts

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात