भोसरी एमआयडीसीत सुरक्षेचा बोजवारा! छतावरून पडून २६ वर्षीय कामगाराचा मृत्यू; कंपनीच्या जबाबदार व्यक्तीवर गुन्हा

काशिनाथ शिंदे  : भोसरी

भोसरी एमआयडीसी परिसरातील एका उद्योगात सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने २६ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छतावरील पत्रे बदलण्याचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी न घेतल्याप्रकरणी कंपनीच्या संबंधित जबाबदार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.४५ वाजता जे-ब्लॉक, प्लॉट क्रमांक ३५९, एमआयडीसी भोसरी येथील शुभम उद्योग कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली. मोहम्मद सय्यद शोहराब (वय २६) हे छतावरील पत्रे बदलण्याचे काम करत असताना अचानक तोल जाऊन खाली लोखंडी पाईपवर कोसळले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी पोलिस हवालदार जितेंद्र चंद्रकांत पाचर्णे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर विजयकुमार भट (वय ५३, रा. धनकवडी, पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना न करता निष्काळजीपणे काम करून घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत असून, वृत्त लिहिपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.

See also  दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा बलात्कार-पॉक्सो आरोपी अखेर जेरबंद; कर्नाटकातून खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!