डीजेच्या वादातून रक्तरंजित रथयात्रा! कोयत्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; नातेजमध्ये गँगचा धुडगूस, सहाजणांवर गुन्हा

काशिनाथ शिंदे: जामखेड

जामखेड तालुक्यातील नातेज येथे रथयात्रा उत्सवादरम्यान डीजे सुरू करण्याच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामुळे रथयात्रेच्या आनंदोत्सवाला गालबोट लागले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, डीजे वाजविण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर काही युवकांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर रथयात्रेत एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

जखमी तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

धार्मिक उत्सवादरम्यान घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली असून, अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

See also  गांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!