सराईत ‘बिल्ला’च्या मुसक्या आवळल्या! पिस्टल अन् जिवंत काडतूसासह देहूरोड पोलिसांची धडक कारवाई

काशिनाथ शिंदे : देहूरोड

देहूरोड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करत संभाव्य गंभीर गुन्हा उधळून लावला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

अरबाज उर्फ बिल्ला युसुफ खान (वय २४, रा. शितळानगर, थॉमस कॉलनी, मामुर्डी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. देहूरोड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एक तरुण पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगून संशयास्पदरीत्या फिरत आहे. माहितीची तात्काळ दखल घेत गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचला.

शुक्रवारी (दि. १) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास देहूरोड येथून साईनगरकडे जाणाऱ्या मुरुगन टेम्पल मार्गावर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे ५२ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तपासात आरोपी अरबाज उर्फ बिल्ला खान हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात पाच, तर खडकी आणि वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव, लखनकुमार वाव्हळे, पोलीस हवालदार किरण खेडकर, सुरेश ढवळे, पोलीस शिपाई प्रशांत माळी, पंकज भदाणे, शुभम बावनकर, धीरज अंभोरे, मोमीन शेख आणि संतोष महाडिक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

See also  मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण; २३ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!