पीसीसीओईमध्ये प्रथम वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचा उत्साहात स्वागत समारंभ
काशिनाथ शिंदे
पिंपरी : महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि व्यक्तिमत्व विकासावरही भर द्यावा. संवाद कौशल्य विकसित केल्याने व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होते, तर स्वनिर्णयक्षमता वाढल्याने आत्मविश्वासाला बळ मिळते. महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करून आपले उज्ज्वल करिअर घडवावे, असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होते.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, प्रशिक्षण व नियुक्ती विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. के. राजेश्वरी, शैक्षणिक व सामाजिक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. लीना शर्मा, अधिष्ठाता डॉ. पी. ए. देशमुख, तसेच डॉ. रजनी पी. के., डॉ. एस. व्ही. शिंदे, डॉ. एस. एस. सोनार, डॉ. नरेंद्र देवरे, डॉ. महेश कोलते, डॉ. वर्षा हरपाळे, डॉ. एस. यू. भंडारी, डॉ. रोशनी राऊत, डॉ. सोनाली पाटील, डॉ. एस. एस. सांबरे, डॉ. ए. डी. ठाकरे, डॉ. जे. व्ही. कट्टी, डॉ. ए. के. गायकवाड, डॉ. एस. बी. माटेकर, डॉ. पी. आर. काळे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
डॉ. शितलकुमार रवंदळे म्हणाले की, सध्या जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा असून या क्षेत्रामुळे गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःला सक्षम करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी पीसीसीओईसह पीसीईटी अंतर्गत विविध महाविद्यालये आवश्यक सुविधा आणि संधी उपलब्ध करून देत आहेत. मात्र, त्याचा प्रभावी उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांचे स्वतःचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.
डॉ. लीना शर्मा यांनी विद्यार्थी सक्षमीकरण, वैयक्तिक विकास, शैक्षणिक उत्कृष्टता आणि जबाबदार नागरिकत्व याबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या विकासाची जबाबदारी स्वीकारावी आणि सातत्याने उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
समारोप सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पालक सभा घेण्यात आली. यावेळी पीसीसीओईमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थी साहाय्य व्यवस्था आणि उपलब्ध विविध संधींबाबत पालकांना माहिती देण्यात आली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत डॉ. लीना शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पेंडम व प्रा. रेबीका जॉर्ज यांनी केले. आभार प्रा. अंजली साकुरकर व प्रा. दिनेश कुटे यांनी मानले.






