पवनचक्की प्रकल्पातील वीजवाहिनी तारांची चोरी उघड! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४ गुन्हे उघड, २ आरोपी जेरबंद, १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील विविध पवनचक्की प्रकल्पांमधून वीजवाहिनीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल १६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पवनचक्की प्रकल्पातील तार चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांमधून वीजवाहिनीच्या तारा चोरीस जाण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना हे गुन्हे तातडीने उघड करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, २४ जुलै २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वाशी तालुक्यातील बोरी पाटी पारधी पिढी परिसरातून दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक महिंद्रा स्कॉर्पिओ आणि एक अशोक लेलँड दोस्त वाहन जप्त करण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपींनी आपल्या साथीदारांसह आंबेवाडी, बरमगाव, लोहारा आणि कळदेव निबाळा शिवारातील पवनचक्की प्रकल्पांमधून वीजवाहिनीच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून २९९ किलो वजनाच्या वीजवाहिनीच्या तारा, तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली दोन्ही वाहने असा एकूण १६.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना बेंबळी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण तसेच रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

See also  भोसरी एमआयडीसीत गुटख्याचा साठा जप्त; २६ वर्षीय तरुणावर गुन्हा
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!