काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड
भोसरी विधानसभा क्षेत्रातील भाजप स्वयंरोजगार युवा मोर्चाला नवे नेतृत्व मिळाले असून, सौ. दीपाताई मनोज काळे यांची भोसरी विधानसभा भाजप स्वयंरोजगार युवा मोर्चा, प्रभाग क्रमांक ५ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नियुक्तीचा सोहळा “श्री स्वामी समर्थ” यांच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी आदरणीय गुरुपुत्र नितीनभाऊ, पुणे जिल्हा ऊर्जास्थान सतीश दादा मोटे नगरसेवक उदय गायकवाड, योगेशभाऊ लांडगे, विलासभाऊ मडेगिरी, नगरसेविका अर्चना ताई सस्ते, सारिका ताई बोराटे, सारिका ताई लांडगे, पिंपरी-चिंचवड भाजप स्वयंरोजगार युवा मोर्चाच्या अध्यक्षा योगिता ताई जाधव तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष गोरख गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दीपाताई मनोज काळे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील सामाजिक, संघटनात्मक आणि जनसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भोसरी विधानसभा क्षेत्रात स्वयंरोजगाराला चालना देणे, युवकांना संघटित करणे आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
- नियुक्तीनंतर सौ. दीपाताई मनोज काळे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन बळकट करण्यासाठी आणि युवकांच्या हितासाठी सातत्याने कार्य करण्याची ग्वाही दिली.
